मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सोबत होत्या म्हणून मी निश्चिंत होतो – रामदास कदम

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सोबत होत्या म्हणून मी निश्चिंत होतो – रामदास कदम

मुंबई –  राज्यामध्ये उद्यापासून प्लास्टिक बंदीवर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवी वापरणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून प्लास्टिक पिशवी बाळगली तर 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून कापडी पिशवी वापरण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. तसेच ८० टक्के प्लास्टिक गुजरातमधून येते, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर दबाव येईल असं वाटलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांची पत्नी प्लास्टिक बंदीच्या सोबत होत्या. त्यामुळं मी निश्चिंत होतो. असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. तसेच गुजरातमधून आलेले ५० टन प्लास्टिक पकडून हे प्लास्टिक गुजरातमधूनच येत असल्याचं मी सिद्ध केलं तसेच प्लास्टिक बंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. मला घरी बसावे लागले तरी चालेल पण मी निर्णय बदलणार नाही. असंही कदम यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही प्लास्टिक बंदीचं स्वागत केलं आहे. गटारी, नाल्यांमध्ये प्लास्टिक अडकल्यानेच मुंबईत पाणी तुंबते. मागील वर्षीच्या २९ ऑगस्टच्या पावसानंतरच प्लास्टिक बंदीचा विचार सुरू झाला होता असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच अजोय मेहता बीएमसीचे सिंघम आहेत. त्यांनी काम हातात घेतले की ते धडाडीने पूर्ण करतात असा विश्वासही यावेळी आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याबाबत दर्शवला आहे.

COMMENTS