राज ठाकरेंना पुतण्याची एवढी भीती का वाटतेय ? –रामदास कदम

राज ठाकरेंना पुतण्याची एवढी भीती का वाटतेय ? –रामदास कदम

मुंबई – प्लास्टिक बंदीनंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांचे आभार मानत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांना पुतण्याची एवढी भीती का वाटायला लागली आहे आहे असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी निर्णय घेतला म्हणून विरोध केला जात आहे का ?, बोर्ड लावण्याआधी मला भेटले असते तर मी खुलासा केला असता. 9 महिने आधी निर्णय जाहीर केला. आम्ही जाहिराती देऊन सर्वांना कल्पना देऊन वेळ, घेऊन निर्णय अंमलात आणला असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी वरळीला प्रदर्शनाला भेट द्यावी आणि बघावे नक्की कशावर बंदी आहे, पर्याय काय आहे ते.  राजकारण करायचे आणि आदित्य ठाकरेंना बदनाम करायचा एकहाती कार्यक्रम राज ठाकरे करत आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात होती आता आदित्य ठाकरेंवर टीका केली जात असल्याचंही यावेळी रामदास कदम यांनी म्हटलं आहेत. चांगल्या गोष्टीमध्ये कोणी खोडा घालत असेल तर ते चुकीचे आहे. आधी दंड कमी होता त्यामुळे कोणी जुमानत नव्हते, म्हणून मोठा दंड लावण्याचा नाईलाजाने निर्णय घेतला.  सर्वसामान्यांनाचा ठेका तुम्हीच घेतला नाही त्यांची काळजी मलाही आहे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. नॉन ओव्हनच्या पिशव्यांवर बंदी आहे, त्या कोणीही घेऊ नका. तसंच सर्व प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्याचंही रामदास कदम यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS