राज्यातील घावूक पक्षांतरावर रामदास फुटाणेंची वात्रट टीका!

राज्यातील घावूक पक्षांतरावर रामदास फुटाणेंची वात्रट टीका!

मुंबई – लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच अजूनही काही नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोण कोणत्या पक्षात जात आहेत याचा ताळमेळ लागत आहे. शिवसेना-भाजपमधील काही नेते पक्ष सोडत आहे. एकूणच राज्यात सुरु असलेल्या या पक्षांतरावर कवी रामदास फुटाणे यांनी एक कविता केली आहे. ही कविता राज्यात चांगलीच गाजत आहे.

रामदास फुटाणे यांची कविता?

शूर आम्ही आमदार आम्हाला
फक्त “ईडी”ची भिती
वित्त भक्त अन् सत्तेसाठी
कमळ घेतले हाती

मतपेटीच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत
सिंहासनाशी लगिन लागलं
जडली वेडी प्रीत
लाख निवडणूका झेलून घेईन
अशी पहाडी छाती

जिंकावे अन् मिरवून घ्यावे
हेच आम्हाला ठावं
हरलो जर, तर ‘परिषदेवर’
राज्यसभेवर घ्यावं
“कृष्णलक्ष्मी” पाहून जमती
सारी नातीगोती”….

रामदास फुटाणे

COMMENTS