मला विधानसभेपेक्षा लोकसभेत जायला आवडेल – रामराजे नाईक निंबाळकर

मला विधानसभेपेक्षा लोकसभेत जायला आवडेल – रामराजे नाईक निंबाळकर

नाशिक – मला विधानसभेपेक्षा लोकसभेत जायला आवडेल असं वक्तव्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. मी हाडाचा शिक्षक आहे. त्यामुळे मला लोकसभेत जायला आवडेल असं नाशिकमधील एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरुन रामराजे यांनी आगामी निवडणुकीत लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान मला विविध विषयांच्या अभ्यासात खुप रस आहे. त्यामुळे मला मुळातच विधानसभेपेक्षा वरच्या सभागृहात जायला आवडेल, तसेच याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खूप वर्षांपूर्वी सांगीतले होते. त्यामुळे तुम्ही उदयनराजेंना रिप्लेस करणार का असं विचारलं असता, मी मूळची फलटणचा आहे. तो मतदारसंघ सातारा मतदारसंघात नाही. फलटण माढा मतदारसंघात समाविष्ट आहे. त्यामुळे उदयनारेंना रिप्लेस करण्याचा विषयच नाही. तसेच याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील. परंतु साताऱ्यातून उमेदवारी करायला काही अडचण नसल्याचंही यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS