रामविलास पासवान एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता, राहुल गांधींच्या नेतृत्वात आज बिहारमधील जागावाटपासंदर्भात बैठक !

रामविलास पासवान एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता, राहुल गांधींच्या नेतृत्वात आज बिहारमधील जागावाटपासंदर्भात बैठक !

नवी दिल्ली – बिहारमधील महाआघाडीसंदर्भात राहुल गांधी यांच्या घरी बैठक होणार आहे. या बैठकीत बिहारमधील जागावाटपासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसेच रामविलास पासवान हे एनडीएमधून बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची घोषणा या बैठकीनंतर होऊ शकते. या बैठकीला राहुल गांधी, तेजस्वी यादव, शरद यादव, जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाह, बिहार काँग्रेस प्रभारी शक्तीसिंग गोहिल उपस्थित असतील.

मोदी विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर सर्व नेते महाआघाडीत आल्याचे जाहीर करणार आहे.

दरम्यान रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी भाजपवर टीका केली आहे. राम मंदिर हा एनडीएचा अंजेंडा नसून तो भाजपचा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं असून राहुल गांधी हे परिपक्व नेते असल्याचं जाहीर झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी तीन राज्यात काम केलं त्यावरुन त्यांचं नेतृत्व सिद्ध होत असल्याचंही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. चिराग पासवान यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS