रामविलास पासवान यांची लोकसभेची वाट बिकट, मुलगी आणि जावयानेच दिले आव्हान !

रामविलास पासवान यांची लोकसभेची वाट बिकट, मुलगी आणि जावयानेच दिले आव्हान !

पाटणा – केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांना आता त्यांच्याच नातेवावाईकाकडून आव्हान मिळालं आहे. पासवान यांची मुलगी आणि जावई यांनी पासवान यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. पासवान यांचे जावई अनिल साधु आणि त्यांच्या पत्नीने नुकताच राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीय जनता दलानं तिकीट दिलं तर निश्चित आपली पत्नी रामविलास पासवान यांच्याविरोधात निवडणूक लढवेल असं अनिल साधू यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पिता विरुद्ध मुलगी असा संघर्ष बिहारमध्ये पहायला मिळण्याची शक्यता आहे.

            रामविलास पासवान यांनी केवळ आपलाच नाही तर संपूर्ण दलित समजाचा अपमान केला असा आरोपही अनिल साधू यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साधू आणि पासवान परिवारात वाद सुरू होता. त्यातूनच साधू यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला आहे. रामविलास पासवान यांची दोन लग्न झाली आहे. त्यांच्या एका पत्नीला दोन्ही मुलीच आहेत. तर दुस-या पत्नीला दोन्ही मुले आहेत.

COMMENTS