शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे आमचे दैवत – राणा जगजितसिंह पाटील

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे आमचे दैवत – राणा जगजितसिंह पाटील

उस्मानाबाद – शरद पवार साहेब, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आमचे दैवत आहेत तसेच ते सदैव राहतील परंतु उस्मानाबादच्या विकासासाठी आपण पक्ष सोडत असल्याचं वक्तव्य राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. उस्मानाबादमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभेतील पराभवानंतर वाईट वाटलं, मात्र अशा गोष्टी घडत असतात, पुढं जायचं असतं, उस्मानाबादला विकासासाठी पाणी आणि उद्योगांची गरज आहे, या जिल्ह्यासाठी आपण सगळे मिळून एक निर्णय घेतोय, हा निर्णय ऐतिहासिक असेल. महाभारतातल्या अभिमन्यू सारखं आपण चक्रव्यूव्हत अडकलोय, माझी गत अर्जुनासारखी झाली आहे आणि माझी जनता कृष्ण आहे असंही राणा पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अनेकांनी अनेक चर्चा केल्या, ऐकल्या,
लोक म्हणत होते निर्णय का घेत नाही. मी आदरणीय पवार साहेब, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत जिल्ह्यातील परिस्थिती अडचणींवर अनेक वेळा चर्चा केली, मात्र झारीतील काही शुक्राचार्यांनी शब्द फिरवले.
हा निर्णय कठोर आहे, काळजावरती दगड ठेवून घ्यावा लागतोय, मात्र घ्यावाच लागेल उस्मानाबादच्या पाण्यासाठी, जिल्हा बँकांसाठी, न्याय मिळवण्यासाठी आपण निर्णय घ्यायला हवा, वेळ लागला कारण खूप विचार केला, मी राज्यमंत्री झालो मात्र संघर्ष सुरूच होता, गेली 15 वर्ष आपला संघर्ष सुरूच आहे,जनतेचं भलं करण्यासाठी हा निर्णय आहे.

तसेच आपल्याला आदर मिळेल तिकडे, शंका बाळगू नका, आम्ही कुठेही गेलो तरी बदलणार नाही, डोळ्यात पाणी आलं, मतदारसंघाबाबत नंतर बोलू, होय मी भाजपमध्ये प्रवेश करतोय माझं जीवित कार्य ठरलंय, या भागाचा सर्वांगीण विकास करणे, आणि यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन मी भाजपमध्ये जातोय. शरद पवार आदर्श आहेत कायम राहतील आज मंगल दिवस आहे, आपला निर्णय मोठा आहे असंही राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS