राणेंना लॉटरी, भाजपकडून मोठी जबाबदारी ?

राणेंना लॉटरी, भाजपकडून मोठी जबाबदारी ?

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आजार बळावल्यामुळे भाजपने नेतृत्वबदलाच्या हालचाली  सुरू केल्या आहेत. पर्रिकर यांचा उत्तराधिकारी कोण यावरुन गोवा भाजपमध्ये घमासान सुरू आहे. गोव्यात भाजपला पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे पर्रिकरांचा उत्तराधिकारी निवडताना भाजपला मित्र पक्षांना विश्वासात घ्यावं लागणार आहे. सूत्रांनी दिल्या माहितीनुसार भाजपमध्ये आरोग्यमंत्री आणि काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वी भाजपात आलेले विश्वजित राणे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

यासंदर्भात उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्याच्या बैठकीला राणे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महाऱाष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे अध्यक्ष सुधीन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री विजय सरदेसाई उपस्थि राहणार आहेत. दरम्यान काँग्रेसचे दोन आमदारही भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेसनंही राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

COMMENTS