“…त्यामुळे नारायण राणेंचं राजकीय वजन वाढणार नाही !”

“…त्यामुळे नारायण राणेंचं राजकीय वजन वाढणार नाही !”

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीवर नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या लढलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे समिर नलावडेंना केवळ 37 मते मिळाली आहेत. दरम्यान कणकवली नगरपंचायत यापूर्वी नारायण राणे यांच्या ताब्यात होती. त्यामुळे आता ३७ मतांनी मिळविलेल्या विजयाने राणेंचे कोणतेही राजकीय वजन वाढणार नसून ते पूर्वी महाराष्ट्राचे नेते होते, आता ते सिंधुदुर्गापुरते मर्यादित झाले असल्याचा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

दरम्यान या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीमुळेच मतांचे विभाजन झाले. त्याचाच फटका बसला असल्याची कबुलीही केसरकर यांनी दिली आहे. कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना-भाजपा युती करण्याचे मान्य झाले होते. पण आयत्यावेळी चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्यात आल्या हे योग्य नाही. जर युती करायची होती तर युतीच करायची. वैभववाडी येथे मैत्रीपूर्ण युती केल्याने पराभव झाला हे मोठे उदाहरण समोर असतानाही कणकवलीत त्याचा धडा घेतला नाही. त्यामुळेच मतांचे विभाजन झाले आणि त्यातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना अवघी ३७ मते कमी पडली असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS