केंद्रीय मंत्र्याने दिले मुख्यमंत्र्यांना आव्हान

केंद्रीय मंत्र्याने दिले मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई – सध्या राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या काळात नामांतराचा प्रश्न सुटला नाही, म्हणून आता सोडवला जावू नये, असे काही नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिक स्पष्ट करावी, असे आव्हान दिले आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतरबाबत सध्या राज्यात वादविवाद सुरू असून शिवसेनेने संभाजीनगर करण्याची मागणी लावू धरली आहे. त्याला भाजप आणि मनसेने पाठिंबा दिला आहे. मात्र, काॅंग्रेसने त्यास विरोध दर्शवल्याने महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

याबाबत केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे. दानवे म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून करीत आहे. मात्र, सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काॅंग्रेसने विरोध दर्शवल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व घटक पक्षांची बैठक घेऊन संभाजीनगर असे नामांतर करावे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तेव्हा शिवसेनेने नामांतराच्या मुद्द मांडला नव्हता. तेव्हा नामांतर झाले नाही. मग आता नामांतर झाले पाहिजे. यासाठी सरकार म्हणून मुख्यमंत्री व शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

COMMENTS