रावसाहेब दानवेंची अनोखी शक्कल, जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा !

रावसाहेब दानवेंची अनोखी शक्कल, जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा !

जालना – आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्ष आतापासूनच मोर्चेबांधणी करत आहेत. तसेच प्रत्येक पक्षातील उमेदवार हे आपण केलेल्या कामांची जाहिरातबाजी करत असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे यांनी देखील जाहिरातबाजीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात वह्या वाटप करण्यास सुरुवात केली आहे. परंतु स्वस्त दरात देण्यात येणा-या या वह्यांबाबत सध्या जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण दानवे यांनी या वह्यांवर भाजपची जाहिरात छापली आहे.

दरम्यान दानवे यांनी मागील चार वर्षात भाजपनं केलेल्या कामांची जाहीरात या वह्यांवर छापली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विद्यार्थ्यांना स्वस्त दरात वह्या देणं ठिक आहे. परंतु त्या वह्यांवर भाजपच्या जाहिरातींचा वापर करणे हे चुकीचं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

COMMENTS