तर आधीपेक्षा एक जागा जास्तच जिंकू -रावसाहेब दानवे

तर आधीपेक्षा एक जागा जास्तच जिंकू -रावसाहेब दानवे

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीच्या चर्चेसाठी शिवसेना मुंडावळ्या बांधून बसलेली नाही असं वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला टोमणा मारला आहे. युती झाली नाही तर आधीपेक्षा एक जागा जास्तच जिंकू असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते.

दरम्यान  यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युती इतकी भक्कम आहे की, सौम्यच काय, तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार नाही. काही तडे गेले असले तरी तेही लवकरच भरून निघतील असं म्हटलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही युती व्हावी अशीच इच्छा असून ‘युती होणार नाही’ असे सांगणारे संजय राऊत उघडे पडतील, असा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे शिवसेना भाजपच्या युतीबाबत अजूनही संभ्रम अॊल्याचं दिसत आहे.

COMMENTS