मराठा आरक्षणावर तोडगा निघाला, रावसाहेब दानवे यांचा दावा !

मराठा आरक्षणावर तोडगा निघाला, रावसाहेब दानवे यांचा दावा !

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरात आंदोलन सुरु आहे. मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अशातच मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला असल्याचा दावा भाजप तर्फे करण्यात आला आहे. हैद्राबाद संस्थान असताना मराठा समाज ओबीसीमध्ये होता. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचा दर्जा दिला जाऊ शकतो, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. यावर उच्च न्यायालयात सरकार बाजू मांडणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

दरम्यान रावसाहेब दानवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली असून मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हैद्राबाद संस्थानात मराठे ओबीसीमध्ये होते. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचा दर्जा देता येईल. हा मुद्दा सरकारच्या विचाराधीन असून सरकार उच्च न्यायालयात हीच बाजू मांडणार असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS