अजित पवार लवकरच जेलमध्ये जातील, रावसाहेब दानवेंचे संकेत !

अजित पवार लवकरच जेलमध्ये जातील, रावसाहेब दानवेंचे संकेत !

पिंपरी चिंचवड सिंचन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच जेलमध्ये जातील असे संकेत भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवारांची माहिती या आधीच  बंद पाकिटात दिली आहे  त्यामुळे ते  जेलमध्ये जातील असं दानवे यांनी म्हटलं आहे.

या आधी 27 नोव्हेंबर 2018ला लाचलुचपत विभागानं राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांवर ठपका ठेवला आहे. या घोटाळ्यात अजित पवारच जबाबदार असून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा दावा या विभागानं प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टात केला होता. लाचलुचपत विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी नागपूर हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं.त्यानंतर आज याबाबत रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केल्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS