अनिल गोटेंच्या नाराजीबाबत रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया ! VIDEO

अनिल गोटेंच्या नाराजीबाबत रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया ! VIDEO

मुंबई – भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली होती. तसेच येत्या 19 नोव्हेंबररोजी आपण पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची घोषणाही अनिल गोटे  यांनी केली आहे. धुळे महापालिकेच्या कार्यक्रमात दुय्यम स्थान दिल्यामुळे गोटे आणि गिरीश महाजन तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब रावसाहेब दानवे यानी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गोटे यांची नाराजी दूर करणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दानवे यांना अनिल गोटे यांची नाराजी दूर करण्यात यश येणार का याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान राममंदिर होण्यासाठी शिवसेनेनं घेतली भूमिका योग्य असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच आम्ही शिवसेनेच्या भूमिकेचे स्वागत करतो, ते एका चांगल्या गोष्टीला मदत करत आहेत असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे. ते कल्याणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

COMMENTS