मधू चव्हाण आणि राम कदम यांच्याबाबत रावसाहेब दानवे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

मधू चव्हाण आणि राम कदम यांच्याबाबत रावसाहेब दानवे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. मधू चव्हाण प्रकरणबाबत दोन वेळा याआधी चौकशी झाली असून पोलिसांनी प्रकरण बंद केलं होतं. आता कोर्टामार्फत गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत आता चौकशी सुरू केली आहे. चौकशी झाल्यावर निर्णय घेऊ असं दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान म्हाडाचे अध्यक्षपद सोडणार का? असा प्रश्न विचारला असता यावर थेट उत्तर न देता चौकशी झाल्यावर निर्णय घेऊ असंही दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच भाजपचे प्रवक्ते राम कदम यांच्यावर कारवाई झाली का? या प्रश्नावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना योग्य समज देण्यात आली आहे. त्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये अशी कोणतीही सूचना त्यांना करण्यात आलेली नसल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS