पगडीवरुन रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर जोरदार टीका !

पगडीवरुन रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर जोरदार टीका !

नाशिक – पगडी विषयावरुन सुरू केलेल्या राजकारणाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही पगडीने नाही तर डोक्याने काम करतो असा टोला दानेव यांनी लगावला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आज रावसाहेब दानवे हे नाशिकमध्ये गेले आहेत. यादरम्यान दानवेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान शिक्षक पदविधर निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी पगडी विषयावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्ही पगडीने नाही तर डोक्याने काम करतो असं दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे दानवे यांच्या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय उत्तर दिलं जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS