औरंगाबाद अत्याचार प्रकरणाचा तपास महिला पोलिसांकडे देण्याची निलम गोऱ्हेंची मागणी

औरंगाबाद अत्याचार प्रकरणाचा तपास महिला पोलिसांकडे देण्याची निलम गोऱ्हेंची मागणी

औरंगाबाद – “औरंगाबादमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. यात आरोपी म्हणतो तो मी नव्हेच! याशिवाय पीडित मुलीवर आणि कुटुंबावर दबाव आणत आहे. त्यामुळे पूर्वीच्या केसेसप्रमाणे या केसमध्ये देखील पोलिसांकडून बी समरी रिपोर्ट दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला. याप्रकरणी मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. तर दुसरीकडे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला आहे.

याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. ” बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणात बी समरी रिपोर्टची शक्यता लक्षात घेत या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे. तसेच “या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस बी समरी फाईल करु शकतात. तसंच मेहबूब शेख हा तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहे, असे गोरे यांनी म्हटल आहे.

COMMENTS