प्रज्ञासिंग ठाकूर यांना भाजपची उमेदवारी कशी ? – रत्नाकर महाजन

प्रज्ञासिंग ठाकूर यांना भाजपची उमेदवारी कशी ? – रत्नाकर महाजन

मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मोकाखाली कारवाई झालेल्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे, त्यावर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी सवाल उपस्थित केला आहे.

महाजन पुढे म्हणाले की, प्रज्ञासिंग यांच्यावरील मोकाखालील कारवाई कोर्टाने बरखास्त केली असली तरी अन्य दहशतवादविरोधी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई चालुच आहे. राष्ट्रीय सुरक्षेविषयी काँग्रेसला चिंता नसल्याचा निराधार व खोटा आरोप काँग्रेसवर करणाऱ्या भाजपाने स्वतः मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी खिलवाड करणाऱ्या प्रज्ञासिंग यांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण स्वतःच कसे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर नाही हे सिद्ध केले आहे, असेही महाजन म्हणाले.

COMMENTS