रविकांत तुपकरांनी घेतली उदयनराजेंची भेट, तासाभराच्या भेटीमुळे चर्चेला उधाण !

रविकांत तुपकरांनी घेतली उदयनराजेंची भेट, तासाभराच्या भेटीमुळे चर्चेला उधाण !

सातारा – पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. सातारा येथील जलमंदिर या महाराजांच्या निवासस्थानी ही भेट घडून आली. तब्ब्ल तासभर चाललेल्या उभय नेत्यांच्या भेटीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली तथापी या चर्चेचा संपूर्ण तपशील कळू शकलेला नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी उदयनराजेंची भेट घेतली आहे. तसेच येत्या 24 फेब्रुवारी रोजी खा. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस असून हा वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी उदयनराजेंच्या सातारा येथील “जलमंदिर राजवाडा” या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी वस्त्रोदयोग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबद्ल महाराजांनी तुपकरांचे त्यांच्या खास शैलीत अभिनंदन केले. या दोन नेत्यांमध्ये तब्ब्ल एक तास चर्चा झाली. या संपूर्ण चर्चेत राजकारण हाच विषय होता. तथापी या चर्चेचा नेमका तपशिल बाहेर येवू शकला नाही. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे  राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

 

 

COMMENTS