सरकार राजू शेट्टींचा दाभोळकर करण्याच्या तयारीत – रविकांत तुपकर

सरकार राजू शेट्टींचा दाभोळकर करण्याच्या तयारीत – रविकांत तुपकर

कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांवी धक्कादायक विधान केलं असून हे सरकार खासदार राजू शेट्टींचा दाभोळकर करण्याच्या तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस परिषदेत रविकांत तुपकर यांनी हे विधान केलं आहे. तसेच आज घेण्यात आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत काही ठराव मांडण्यात आले आहेत. ते खालीप्रमाणे…

1)उत्पादन खर्चावर आधारित दिड पट हमी भाव मिळावा आणि संपूर्ण कर्ज मुक्ती मिळावी.

2) ज्या साखर कारखानदारांनी २०१७-२०१८ सालची एफआरपी दिलेली नाही, त्या संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

3) सरकारने त्वरीत विनानिकष दुष्काळ जाहीर करुन, राज्यात आधारभूत किमतीवर भात, सोयाबीन, तुर, मका, उडीद आणि मुग यांची खरेदी केंद्र शासनाने त्वरित सुरु करावी.

4) एफआरपीचा बेस ९:३० वरुन १०:३० टक्के करावे.

5) शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरित रद्द करावे.

6) सरकारनं गाय दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केल आहे. ते अनुदान १ नोव्हेंबर २०१८ रोजी बंद करणार आहे. सरकारने या अनुदानाला एक महिने मुदतवाढ द्यावी.

7) राज्य सरकारने महाराष्ट्र भूजल अधिनियम विधेयक लागू करण्याचा घाट घातला आहे. हे विधेयक म्हणजे शेतकऱ्यांना मातीत घालणारा आहे. या विधेयकाला ही परिषद विरोध करत आहे. विनाअट हे विधेयक सरकारने मागे घ्यावे.

8)) शेती बरोबर वस्त्रोद्योग हा व्यवसाय रोजगार उपलब्ध करणारा आहे. कोल्हापूर हा व्यवसाय संकटात असून महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे यंत्रमागासाठी वीज दरांमध्ये आणि कर्जामध्ये पाच टक्के व्याजदर सवलत देण्यात यावी.

9) मराठा लिंगायत धनगर आणि मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे.

COMMENTS