राजू शेट्टींना धक्का, रवीकांत तुपकर यांचा राजीनामा !

राजू शेट्टींना धक्का, रवीकांत तुपकर यांचा राजीनामा !

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना धक्का बसला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी राजीनामा दिला आहे.
रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसंच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला आहे. “मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजुर करावा” असं रवीकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रवीकांत तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे रवीकांत तुपकर येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुपकर यांच्या सदाभाऊ खेत यांनी प्रतिक्रिया दिली असून रवीकांत तुपकर मेहनती आहेत आणि त्यांनी मोठं काम केलं आहे. स्वाभिमानी पक्षाने त्यांना आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. माझी आणि त्यांची 2 ते 3 वेळा भेटी झाल्या. मात्र त्यामध्ये पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS