अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं अमृता फडणवीस यांना जोरदार उत्तर !

अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं अमृता फडणवीस यांना जोरदार उत्तर !

मुंबई – अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना जोरदार उत्तर दिलं आहे.सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा राजकीय मुद्दा करून ट्वीट करू नये, जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हाही असेच ट्वीट केले असतं का?’ अशा शब्दांत रेणुका शहाणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

तसेच तुम्ही हे असं कसंच म्हणू शकता, जिथे मुंबई शहरात लाखो लोकांचे संसार चालतात. हे शहर लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास ताकद देते. पण एवढंच नाहीतर विना झेड सुरक्षा सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते’, कोरोनाच्या परिस्थितीतही मुंबई पोलीस हे आपल्या सर्वांची 24 तास सुरक्षा पुरवत आहे’ असंही शहाणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार असा सामना रंगला आहे. तपासावरून दोन्ही राज्यामध्ये वाद पेटलेला असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच बोट ठेवून वादात उडी घेतली होती.अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे ट्वीट केले होते. ‘सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही. इथं निष्पाप लोकांच्या बाबतीत माणुसकी दाखवली जात नाही.  मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

COMMENTS