“मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या !”

“मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या !”

बई – मुंबई विद्यापीठाचं नाव बदलून ‘राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ’ करण्यात यावं अशी मागणी  शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केली आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेत त्यांनी प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळेल असा विश्वास दत्ता नरवणकर यांनी केला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय या प्रस्तावाला सहमती दर्शवतील का हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद सुरु असून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देणयाची मागणी केली गेली होती. त्याबाबत राज्य सरकारने घोषणाही केली होती. मात्र हा वाद हायकोर्टात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडलं आहे. त्यामुळे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी मुंबई विद्यापीठाला राजमाता  जिजाऊ भोसले हे नाव देण्याची केलेली मागणी पूर्ण होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS