मराठा आरक्षणावरुन एका आमदारासह नगर परिषदेच्या उपाध्यक्षांचा राजीनामा !

मराठा आरक्षणावरुन एका आमदारासह नगर परिषदेच्या उपाध्यक्षांचा राजीनामा !

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आज एका आमदारासह नगर परिषदेच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी तसेच मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या संदर्भातील नियमानुसार असणारी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे भालके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जालना नगर परिषदेच्या उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजेश राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. मराठा आरक्षणाकरीता आपण नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं राजेश राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यातील आणखी काही आमदारांनी आपला राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखी तापत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS