“यंदा लढवलेली निवडणूक अखेरची”, या नेत्यानं केलं जाहीर!

“यंदा लढवलेली निवडणूक अखेरची”, या नेत्यानं केलं जाहीर!

मुंबई – यंदा लढवलेली निवडणूक अखेरची असल्याचं बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. राजकारणाने पातळी सोडली असून दोन गोळ्या घालण्याची भाषा केली जात आहे. माझ्या पत्नीला यावर भाष्य करावं लागलं. सौभाग्य आणि कोक संपवणाऱ्यांना जागा दाखवा, असं आवाहन करावं लागलं. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे,तसेच वसई तालुक्याची नाहक बदनामी होत असल्यामुळे यंदाची निवडणूक अखेरची आहे परंतु राजकारण सोडणार नसून जनतेची साथ नाही असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भावनिक किंवा मतदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी मी मतदानाच्या अगोदर हा निर्णय घेऊ शकलो असतो. पण मला लोकांना भावनिक करायचं नव्हतं, तर मेरिटवर निवडणुकीत विजय मिळवायचा होता.वसई, नालासोपारा, बोईसर या तिन्ही सीट मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. आमचा एकही उमेदवार पडला, तर ईव्हीएम घोटाळा असेल, असाही दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
तसेच या निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं या सर्वांनीच मला मदत केली असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

COMMENTS