शरद पवारांच्या नातीनं सांभाळलं पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग !

शरद पवारांच्या नातीनं सांभाळलं पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नातीनं त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग सांभाळलं आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती या स्वतः आजोबांना घरी नेण्यासाठी राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. कार्यक्रम संपताच रेवती यांनी शरद पवारांना स्वतःच्या गाडीमध्ये बसवून घरी घेऊन गेल्या. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी त्यांची नातच आज सारथी झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात शरद पवार दैनिंदिन कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका आणि भाजप आमदार अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार घराकडे निघाले होते. यावेळी पवारांची नात आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांनी स्वतः गाडी चालवून पवारांना घरी घेऊन गेल्या. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी त्यांची नातच आज सारथी झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे

COMMENTS