मोदी, शाहांच्या होमपिचवर भाजपमध्ये नाराजी, 20 आमदारांचं बंड ?

मोदी, शाहांच्या होमपिचवर भाजपमध्ये नाराजी, 20 आमदारांचं बंड ?

अहमदाबाद –  आगामी निवडणुकांमध्ये देशात पुन्हा भाजपचं कमळ फुलवण्यासाठी पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून मास्टर प्लान आखला जात आहे. मागील निवडणुकांमध्ये ज्याठिकाणी भाजपची ताकद कमी पडली त्याठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून केला जात आहे. कोणत्याही परिस्थिती दुस-यांदा सत्तेवर येण्याचा मनसुबा भाजपच्या या नेत्यांचा आहे. परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या होमपिचवरच सध्या भाजपमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमधील भाजपचे 20 आमदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसेच यापैकी तीन आमदारांची उघडपणे नाराजी दिसून येत आहे.

दरम्यान गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंड पुकारलं आहे. गुजरातमधील सरकारी अधिकारी आमचं म्हणणं ऐकतच नाहीत, अशी तक्रार आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल यांनी केली आहे. या तीनही आमदारांचा रोख मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच आपणच नाही, तर 20 आमदार भाजपावर नाराज असल्याचा दावा या तीनही आमदारांनी केला आहे.

दरम्यान या आमदारांनी केलेल्या या दाव्यामुळे गुजरातमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून बाकीचे 17 आमदार कोण आहेत, याबाबत सध्या तर्कवितर्क लढविले जात आहे. तसेच या आमदारांनी बंड पुकारले तर मोदी आणि शाह यांना त्यांच्याच होमपिचवर मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देशात सत्ता गाजवायची असेल तर या दोघांनाही आपली होमपिच मजबूत करावी लागणार आहे.

 

COMMENTS