वंचित बहुजन आघाडीत बिघाडी, राजकीय वर्तुळात खळबळ!

वंचित बहुजन आघाडीत बिघाडी, राजकीय वर्तुळात खळबळ!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली असल्याचं दिसत आहे. संघटनेतील पदाधिकारी असलेले लक्ष्मण माने यांनी बंड पुकारले आहे. तवंचित आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही माने यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपाच्या लोकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा थेट फायदा झाला आहे. आघाडी ही आता बहुजनांची राहिली नसून उच्चवर्णीयांची झाली असल्याचं लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत टीका केली आहे. पूर्वी संघाशी आणि भाजपाशी संबंधित असलेल्या गोपीचंद पडळकर यांना वंचित आघाडीत महासचिवपद देण्यात आले. यावर माने यांनी आक्षेप घेतला असून आम्ही आघाडी उभारण्यात मेहनत घेतली मात्र, आता हे आयत्या बिळावर नागोबा झाले असल्याची टीकाही माने यांनी केली आहे.

तसेच पडळकर यांनी माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनीहीयावर प्रतिक्रिया दिली असून ‘वंचित आघाडीत अठरापगड जातीने लोक आहेत. त्यामुळे लक्ष्मण मानेंकडून अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली गेली असेल. वंचित आघाडीत मी एकटा नसून इतरही अनेक नेते आहेत. लक्ष्मण माने हे देखील वंचितचे नेते असून ते पक्षात कायम राहतील,’ असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

वंचित बहूजन आघाडीत सुरु झालेल्या या वादामुळे आगामी निवडणुकीत आघाडी फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS