निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, तो अजूनही जिवंत – रितेश देशमुख

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, तो अजूनही जिवंत – रितेश देशमुख

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु अशातच निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून, तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, असे ट्वीट अभिनेता रितेश देशमुखनं केलं आहे. निशिकांत कामत यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे, सुभाष देसाई यांनीही श्रध्दांजली वाहत ट्वीट केले. मात्र रितेशनं ट्वीट केल्यानंतर त्यांनीही हे ट्वीट डिलीट केले आहे.

दरम्यान निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास आहे. त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धाजलीही वाहन्यात आली आहे. परंतु निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून, तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, असे ट्वीट अभिनेता रितेश देशमुखनं केलं आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाची अफवा कोणी पसरवली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

COMMENTS