शिक्षा ठोठावल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्यावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला !

शिक्षा ठोठावल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्यावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला !

रांची – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं वातावरण असाताना  अशातच त्यांच्यावर दुसरा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना शिक्षा ठोठावल्याच्या धक्क्याने लालूंच्या मोठ्या  बहिणीचे रविवारी निधन झाले आहे. गंगोत्री देवी या त्यांच्या एकुलत्या एका बहिणीच्या निधनामुळे यादव कुटुंबीयांवर मोठं दुःख कोसळलं आहे.

लालूप्रसाद यादव यांना शिक्षा मिळाल्यामुळे त्यांना धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले असल्याचं यादव कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.गंगोत्री देवी या पाटणा येथील व्हेटर्नरी कॉलेजमधील सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होत्या. लालूप्रसाद यादव हे १९९० मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत याच ठिकाणाहून सरकार चालवत होते. गंगोत्री देवी यांच्या तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित दोघे बिहार पोलीस आणि रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. लालूप्रसाद यांच्या सहा भावांमध्ये त्या एकुलत्या एक होत्या. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारीही होत्या. आजारपण आणि लालू प्रसाद यादव यांना शिक्षा ठोठावल्याच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं आहे. दरम्यान बहिणीच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी लालूंचे वकील त्यांना पॅरोल मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

COMMENTS