अखेर रोहीत पवारांचं ठरलं, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

अखेर रोहीत पवारांचं ठरलं, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी अखेर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रोहीत पवार यांनी पक्षाला पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. रोहीत पवार हे सध्या कर्जत-जामखेड जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. या मतदारसंघात त्यांनी आपला जनसंपर्कही वाढवला आहे.

दरम्यान उमेदवारी मागण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षाकडे अर्ज भरुन दिला आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघासाठी पक्षातील अनेक जण उत्सुक आहेत आणि त्यांनीही अर्ज भरुन दिला आहे. रोहित पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड याही इच्छुक आहेत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे दावेदार असतानाही त्यांनी उमेदवारी मागितली नाही. त्यामुळे आता या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS