रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं मोठ वक्तव्य!

रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं मोठ वक्तव्य!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीमधील आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. या आघाडीमुळे आता शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचीच उमेदवारी धोक्यात आली आहे. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, त्यांची ही उमेदवारी आता धोक्यात आली असल्याचं दिसत आहे. कारण
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे.

जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. ही जागा यापुढेही काँग्रेसच लढवेल, असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केलं आहे. बाळासाहेब साळुंखे यांच्या या नव्या वक्तव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरचे मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे.

COMMENTS