पुनम महाजन यांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर !

पुनम महाजन यांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर !

पुणे – भाजपच्या खासदार पुनम महाजन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आजवर महिलांबाबत बेताल विधाने केली, तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी बांधून होत्या, आता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहिले ते तुम्हीच सांगा अशा शब्दांत रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना प्रश्न विचारला आहे. पुनम महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत शकुनी मामा असा उल्लेख केला होता. त्यावरुन रोहित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत पूनम महाजन यांना ३ प्रश्न विचारले आहेत.  गिरीष महाजन म्हणाले होते,
“दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”

गिरीष बापट म्हणाले होते,
“तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.”

राम कदम म्हणाले होते,
“पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे…
आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या का असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता असंही त्यांनी म्हटलं आहे.

गिरीष महाजन म्हणाले होते, “दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”गिरीष बापट म्हणाले होते,…

Posted by Rohit Rajendra Pawar on Monday, February 4, 2019

COMMENTS