…तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं, ते शेवटपर्यंत राहणार, आमदार रोहित पवारांची ‘लव्ह स्टोरी’!

…तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं, ते शेवटपर्यंत राहणार, आमदार रोहित पवारांची ‘लव्ह स्टोरी’!

सांगली – दोन दिवसांवर व्हॅलेंटाईन डे आहे, त्यानिमित्त सर्वच जण आपलं प्रेम व्यक्त करतात. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डेला विशेष महत्त्व आहे.यानिमित्त राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. कॉलेजमध्ये असताना माझं कोणाबरोबर प्रेम झालं नाही. मी आयुष्यात एकदाच प्रेम केले, ते म्हणजे फक्त माझ्या बायकोवर आणि ते शेवटपर्यंत राहणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तरुणांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, मी मुंबईमध्ये होतो. या सर्व प्रवासात काही प्रमाणात कष्टावर प्रेम होतं. त्यावेळी जीम करायचो. जीमवर प्रेम होतं. पण कॉलेजमध्ये तुम्हा सर्वांना जे प्रेम होतं तसं प्रेम मला काही कधी झालं नाही.

दरम्यान कॉलेजचं जीवन खूप भारी असतं. मलाही कॉलेजचं जीवन आवडायचं. तेव्हा टेंशन अजिबात नव्हतं. घरुन दोन हजार रुपये महिन्याला यायचे. त्यातच कसातरी महिना निघायचा. कधी पैसे कमी पडले, तर मित्र असायचेच. तुम्ही सर्वजण ज्या प्रकारच्या प्रेमाचा विचार करतात, तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं. ते प्रेम माझ्या बायकोवर केलं. हेच प्रेम शेवटपर्यंत राहणार आहे असंही रोहित पवार म्हणाले.

COMMENTS