रोहित पवारांच्या दिलदारपणामुळे राम शिंदे झाले भावूक, फेटा बांधून केला सत्कार!

रोहित पवारांच्या दिलदारपणामुळे राम शिंदे झाले भावूक, फेटा बांधून केला सत्कार!

कर्जत – राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे. विजय मिळवताच रोहित पवार यांनी राम शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. एवढच नाही तर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या मातोश्रींचे आशीर्वादही घेतले. राम शिंदेंच्या मातोश्रींच्या पायावर रोहित यांनी आपला माथा टेकवला आणि आशीर्वाद असू द्या असं म्हणाले. त्यानंतर राम शिंदे यांच्याशी रोहित यांनी हस्तांदोलन केलं. रोहित पवारांचा हा स्वभाव पाहून राम शिंदे हे देखील भारावून गेले आणि रोहित पवारांचं फेटा बांधून स्वागत केलं.

दरम्यान महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला आहे. रोहित पवार यांना 135824 तर भाजपचे राम शिंदे यांना  92477 मते मिळाली. राेहित पावर यांचा 43347 मतांनी रोहित पवार यांचा विजय झाला आहे. हा विजय झाल्यानंतर रोहित पवार यांनी स्वत: घरी जाऊन राम शिंदे यांची भेट घेतली. आपल्या प्रतिस्पर्ध्याचीच त्यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS