अमित शाहांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, पक्ष सोडणारांनाही लगावला टोला!

अमित शाहांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, पक्ष सोडणारांनाही लगावला टोला!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जि. प. सदस्य रोहित पवार यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पक्ष सोडून जाणाय्रा नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे असा सवाल अमित शाह यांनी सोलापुरातील सभेत केला होता. त्याला रोहित यांनी फेसबुक पोस्टद्वारे उत्तर दिले आहे.
शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे असा सवाल त्यांनी केला होता. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. ‘गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येऊन कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की साहेबांनी काय केलं असा प्रश्न विचारायचा’, ही दुटप्पी भूमिका असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलीय. चांगली मशागत करुन ठेवुया. लवकरच ठरवुया’, असं रोहित यांनी राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे.

रोहीत पवार यांची फेसबुक पोस्ट 

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं?

डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.

पण आत्ता बास झालं.

साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यन्तची हि शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.

सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया.

लवकरच ठरवुया…
कधी कुठे आणि कशी सुरवात करायची.

पण एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार आहे.

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच…

Posted by Rohit Rajendra Pawar on Monday, September 2, 2019

COMMENTS