मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागी असतो तर… – रोहित पवार

मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागी असतो तर… – रोहित पवार

कोल्हापूर –  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. मी जर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागी असतो तर राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली असती. त्यानंतर संपूर्ण देशभर पक्षाचं काय चुकलं आहे याचा अभ्यास केला असता. त्या पद्धतीनं काम केलं असतं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना अधिक संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. ते कोल्हापुरात बोलत होते.

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी चुलत भाऊ पार्थ पवार यांच्या पराभवावरही भाष्य केलं आहे. पार्थ हा खूपच नवखा होता, खूप अनुभवी लोक पडले, त्यांचा पराभव झाला. पार्थच्या पराभवाचा अभ्यास केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.तसेच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभा लढवणार आणि कोणत्या मतदार संघातून लढवणार हे अजून निश्चित झालं नाही. पण पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेनं पार पाडणार असल्याचं ते बोलले. बारामतीत चंद्रकांत पाटलांनी आम्हाला कोणतीही हूरहूर लावली नाही. तसं असतं तर सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य वाढलं नसतं असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS