राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, “असा” साजरा करा शरद पवारांचा वाढदिवस – रोहित पवार , व्हिडिओ

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, “असा” साजरा करा शरद पवारांचा वाढदिवस – रोहित पवार , व्हिडिओ

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस असतो. राज्यातील आणि देशभरातील कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. बहुतेक वेळा कोणी आपल्या भागात पोस्टर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. कोणी पेपरमध्ये जाहिरात देऊन वाढदिवासाच्या शुभेच्छा देतात. तर कोणी टीव्हीवर जाहीरात देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. कोणी फोन करुन, कोणी एसएमस करुन, कोणी वॉट्सअप करुन अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या लाडक्या नेत्याना कार्यकर्ते शुभेच्छा देतात. आता जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे सोशल मीडियातून कशा शुभेच्छा द्यायच्या हे सांगतायेत पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार…

COMMENTS