मनसेच्या 14 व्या वर्धापन दिन सोहळ्यात शॅडो कॅबिनेटची घोषणा, राज्यातील मंत्र्यांच्या कामावर ठेवणार करडी नजर!

नवी मुंबई – मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नवी मुंबईतील वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा असा आदेश मनसेच्या शॅडो कॅबिनेटला दिला आहे. तसेच
प्रतिरुप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसाल, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल, तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा, मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?, काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? असंही राज ठाकरे म्हणालेत.

तसेच यावेळी राज यांनी मनसैनिकांचे आभार मानले. इतक्या चढ उतारानंतर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला आनंद झाला असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शॅडो कॅबिनेट

गृह विधी-न्याय – बाळा नांदगावकर,किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,

कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे नगरविकास,

पर्यटन – संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर

सहकार पणन – दिलिप धोत्रे, कौस्तुभ लिमये

अन्न व नागरीपुरवठा – राजा चौघुले, महेश जाधव

मत्स्यविकास – परशुराम उपरकर

महिला व बालविकास – शालिनी ठाकरे

सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) – अभिजीत सप्रे

सार्वजिन उपक्रम – संजय शिरोडकर सार्वजनिक

आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता

मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान –
अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे

वित्त आणि गृहनिर्माण – नितिन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे

महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर

उर्जा – शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल

ग्रामविकास – जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे,

मदत पुनर्वसन, वने – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी

शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार – अमेय खोपकर

कौशल्य विकास – स्नेहल जाधव

COMMENTS