संघ मुख्यालयात ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा !

संघ मुख्यालयात ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा !

नागपूर  नागपूरमध्ये संघ मुख्यालयात यावर्षी प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच एका आमदाराने ध्वजारोहण केलं आहे. शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांच्या हस्ते संघ मुख्यालयात तिरंगा फडकविण्यात आला आहे. संघ मुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला आहे. आमदार नागो गाणारे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे केरळ सदौ-यावर असल्यामुळे ते आज संघ मुख्यालयात अनुपस्थित होते. केरळमध्ये संघ आणि डावे यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलं आहे. भागवत यांनी पल्लकडमधील एका शाळेत ध्वजारोहण करुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS