राष्ट्रवादीला धक्का, सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश!

राष्ट्रवादीला धक्का, सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडत हाती शिवबंधन बांधलं आहे.’हा निर्णय घेताना मला त्रास झाला. पण राजकारणात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात,’ असे भावनिक उद्गार सचिन अहिर यांनी काढले.

दरम्यान आगामी काळात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल,’ असंही सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. तसेच मी गेल्या आठवड्यात शरद पवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे जे स्थान आहे ते माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मात्र अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात असे अहिर यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कामामुळे प्रभावित झालो असल्याचंही अहिर यांनी म्हटले आहे.

COMMENTS