दाभोळकर हत्ये प्रकरणातील आरोपी सचिन अणदूरेला 7 दिवसाची पोलीस कोठडी !

दाभोळकर हत्ये प्रकरणातील आरोपी सचिन अणदूरेला 7 दिवसाची पोलीस कोठडी !

पुुणे- दाभोळकर हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन अणदूरे याला आज 1 वाजताच्या दरम्यान पुणे येथील न्यायलयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 26 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे अज्ञात इसमांनी मोटरसायकल वर येऊन भर पहाटे गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या हत्ये संदर्भात सीबीआयला मोठे धागेदोरे सापडले आहेत. नालासोपारा गावठी बॉम्ब प्रकरणातील आरोपिकडून चौकशी करीत असताना त्यातील एका आरोपीने दाभोळकरांच्या हत्येची कबुली दिली आहे व त्याच्याकडून सचिन अणदूरे या आरोपीची माहिती मिळाली होती.

सीबीआयने 14 ऑगस्ट रोजी सचिनला औरंगाबाद येथून अटक केली होती. सचिनची कसून चौकशी सुरू असून त्यानेच दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले होते. त्याने हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक हस्तगत करण्यासाठी व सचिन अणदूरे याच्या मागील अजून कोण कोण मास्टरमाइंड आहेत हे जाणून घेण्यासाठी सीबीआयने 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने सचिन अणदूरेला 7 दिवसाची कोठडी सुनावली आहे व 26 ऑगस्ट रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
सचिन अणदूरे याला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आल्याचं त्याच्या वकिलाने बचावामध्ये न्यायालयात युक्तिवाद केला.

COMMENTS