सचिन तेंडूलकरचा मोठेपणा, संपूर्ण पगार दान केला पंतप्रधान निधीला !

सचिन तेंडूलकरचा मोठेपणा, संपूर्ण पगार दान केला पंतप्रधान निधीला !

नवी दिल्ली – ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा मोठेपणा पुन्हा एकदा समोर आला असून राज्यसभा सदस्य या नात्याने सहा वर्षांत वेतन आणि भत्ते म्हणून मिळालेली सुमारे ९० लाख रुपयांची संपूर्ण रक्कम पंतप्रधान कार्यालयाला दान केली आहे.सचिननं केलेल्या या विचारशील कृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिनचे आभार मानले आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने सचिन तेंडुलकरला पत्र पाठविले असून सचिनने दान केलेल्या रकमेचा उपयोग पीडित व्यक्तींच्या मदतीसाठी केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सचिनच्या या मोठेपणाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

दरम्यान यापूर्वीही खासदारासाठी असलेल्या स्थानिक विभाग विकास निधीचा उत्तम उपयोग केला असल्याचा दावा सचिन तेंडुलकरने केला आहे. सदर निधीतून सहा वर्षांत मिळून ३० कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यातील ७.४ कोटी रुपये खर्चून १८५ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असल्याचं सचिननं म्हटलं आहे.

COMMENTS