लोढांनी तुम्हालाही फसवलय का? या ईमेल आयडीवर तक्रार करा -सचिन सावंत

लोढांनी तुम्हालाही फसवलय का? या ईमेल आयडीवर तक्रार करा -सचिन सावंत

मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा बिल्डर आ. मंगलप्रभात लोढा यांनी अनेक सदनिकाधारकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ज्या लोकांना लोढांकडून आपली फसवणूक झाली आहे असे वाटते, त्या सदनिकाधारकांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी [email protected] या ईमेल आयडीवर किंवा टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई -२५ या पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्यात आम्ही त्याचा पाठपुरावा करू असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष व बिल्डर मंगल प्रभात लोढा यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोढा विकासक असलेल्या पलावा सिटी मध्ये म्हाडाने दिलेल्या सदनिका धारकांकडून लोढा यांच्या कंपनीचे लोक पैसे उकळत असल्याच्या तक्रारी अनेक जण दूरध्वनीवरून देत आहेत. यासंदर्भात फसवणूक झालेल्या सदनिकाधारकांनी म्हाडाकडेही तक्रारी केल्या आहेत. पण लोढा हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने व आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष झाल्याने त्यांना सरकारचे पाठबळ प्राप्त आहे, असे दिसते. त्यामुळेच त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. म्हणून ज्या सदनिधारकांना लोढांकडून आपली फसवणूक झाली आहे असे वाटते, त्यांनी [email protected] या ईमेल आयडीवर किंवा टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई -२५ या पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्यात. आम्ही या फसवणूक झालेल्या सदनिकाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करू सावंत म्हणाले.

COMMENTS