सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्करांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पाहा फोटो गॅलरी!

सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्करांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पाहा फोटो गॅलरी!

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर हे मातोश्रीवर गेले होते. यावेळी आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचं मातोश्रीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केल्यानंतर तेंडूलकर आणि गावस्कर हे माताेश्रीवरून बाहेर पडले आहेत.

COMMENTS