सदाभाऊंनी दाखवली माणुसकी, आजारी महिलेला केली तात्काळ मदत !

सदाभाऊंनी दाखवली माणुसकी, आजारी महिलेला केली तात्काळ मदत !

मुंबई – राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अनेकवेळा गरिंबांच्या मदतीसाठी धावून आले असल्याचं पहावयास मिळालं आहे. अशाच एका आजारी असलेल्या मुस्लीम महिलेला त्यांनी मोठी मदत केली आहे. त्यांच्या मदतीमुळे त्या महिलेचे प्राण वाचणार आहेत. सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सबाह फातमा सय्यद ( वय 30 वर्ष ) यांच्यावर किडनी प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. सदाभाऊंनी यासाठी सबिहा यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तात्काळ दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली व उर्वरित रक्कम इतर धर्मादाय विश्वस्त मंडळाकडून उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

तसेच सदाभाऊंनी स्वत: मुंबई सेंट्रलमधील वोकार्ड हॉस्पिटल येथे संपर्क साधून सबाहला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करुन घेण्याचे निर्देश दिले तसेच संबंधित डॉक्टरांशी बोलून तातडीने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे.अशा समस्येत मदत मिळावी म्हणून सबिहा यांनी सदाभाऊंची मंत्रालयात भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली.

दरम्यान सबिहा सय्यद ( वय 57 वर्षे)यांची मुलगी सबाहच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून त्या डायलेसिसवर होत्या. एक भाऊ लहानपणापासूनच दिव्यांग व घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पुढील महागडे उपचार करणे शक्य नव्हते. सबिहा यांनी मुलगीसाठी स्वत:ची किडनी देण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठीचा 7 लाख रुपये इतका खर्च त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे मोठ्या आशेनं त्यांनी मंत्रालयात जाऊन सदाभाऊंची भेट घेतली. त्यानंतर कोणताही विचार न करता सदाभाऊंनी त्यांना तात्काळ मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबानं त्यांचे आभार मानले आहेत.

 

 

COMMENTS