क्रांतीकारकांचा तालुका पंधरा वर्षांपासून गुलामगिरीत, सदाभाऊ खोत यांची टीका !

क्रांतीकारकांचा तालुका पंधरा वर्षांपासून गुलामगिरीत, सदाभाऊ खोत यांची टीका !

सांगली – वाळवा हा क्रांतीकारकांचा तालुका आहे मात्र तो 15 वर्षांपासून गुलामगिरीत राहिला असल्याची जोरदार टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली आहे. या तालुक्यातील लोकांना गुलामगिरीत ठेवण्यात आलं होतं परंतु या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच मुख्यमंत्री हे वारंवार इस्लामपूर येथे येत आहेत असंही सदाभाऊ यांनी म्हटलं आहे. इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रा महोत्सवाचं आज उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते.

दरम्यान अगोदरचं सरकार टँकरमाफियांचं होतं  त्यामुळे त्यावेळी कायम टँकर सुरू होते. मात्र आमच्या सरकारनं सांगली जिल्हा टँकरमुक्त केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.तसेच अगोदरच्या सरकारनं सिंचनाच्या नावाखाली कोणाच्या तिजो-या भरल्या होत्या हे सर्वांना माहीत असल्याची टीकाही त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

COMMENTS