5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवणार – सदाभाऊ खोत

5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवणार – सदाभाऊ खोत

मुंबई – गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान देण्याची मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने येत्या 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजप आणि मित्र पक्षांच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत आम्ही आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाच्या तिस-या टप्प्यात १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रांद्वारे संदेश पाठवला जाईल. यासाठी राज्यभरातून पाच लाख पत्रे पाठवली जाणार असल्याचं खोत यांनी म्हटलं आहे. राज्यात गायीच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. प्रतिलिटर ३० रुपयांवरील दरात मोठी घट झाल्याने दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. या स्थितीत राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे आणि दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे असंही ते म्हणाले आहेत.

तसेच राज्य सरकारने सत्ताधारी आमदारांना 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र हाच निधी आता कोव्हिडच्या रुग्णांसाठी देणं गरजेचं आहे. विकास निधी म्हणून निधी देण्याऐवजी व्हेंटिलेटर, बेड, औषध अशा गोष्टींसाठी खर्च करावा. तात्काळ हा निधी कोव्हिडसाठी वापरात आणावा अशीही मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

COMMENTS