दगड मारून ब्रेकिंग न्यूज करण्यापलीकडे राजू शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही – सदाभाऊ खोत

दगड मारून ब्रेकिंग न्यूज करण्यापलीकडे राजू शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही – सदाभाऊ खोत

कोल्हापूर – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक दगड मारून ब्रेकिंग न्यूज करण्यापलीकडे राजू शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचं खोत यांनी म्हटलं आहे. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सदाभाऊ खोत यांच्या हस्ते येथे झाले. यानंतर पत्रकारांशी बोलत असताना खोत यांनी राजू शेट्टी यांनी पुन्हा सुरु केलेल्या थकीत ऊस देयक मागणी आंदोलनावरून टीका केली आहे. साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत राजू शेट्टी यांच्यात राहिली नाही. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान थकीत ऊस देयकाच्या मागणीसाठी कोल्हापूरात निघालेल्या मोर्चावेळी खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री दिसतील तिथे त्यांना अडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना लक्ष्य करीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावा अन्यथा अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.

त्याचा समाचार घेताना खोत यांनी ‘ अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास ‘इट का जवाब पथ्थर से’ देऊ’ असा प्रतिइशारा शेट्टीं यांना दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवली तर हातकणंगले मतदार संघातूनच लढवणार असल्याचंही खोत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS